मार्खेजच्या निधनानंतर शेकडो मृत्यूलेख आणि डॉक्यूमेंट्रीज प्रसिद्ध झाल्या. मार्खेजचं चरित्र आणि आत्मचरित्रही प्रकाशित झालं आहे. मात्र यापैकी कुठेही न भेटणारा मार्खेज या पुस्तकात भेटतो

२०१४ साली मार्खेजचं निधन झालं. २०२० साली मर्सिडीसचं. या दम्पतीला दोन मुलं. रॉडरिगो आणि गोंझॅलो. रॉडरिगो पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे, तर गोंझॅलो डिझायनर आहे. ‘अ फेअरवेल टू गाबो अँण्ड मर्सिडीस’ हे पुस्तक रॉड्रिगोने लिहिलंय. गॅब्रिअल गार्सिया मार्खेज ऊर्फ गाबो हा पुस्तकाचा नायक आहे, तर मर्सिडीस नायिका. हे पुस्तक पटकथेच्या ढंगानेच लिहिलं आहे. परंतु या पटकथेवर कधीही चित्रपट निघणार नाही.......